विराट कोहलीने मारला द्विशतकांचा ‘चौकार’

0
9

हैदराबाद, दि. 10 – भारतीय कर्णधार विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधील चौथं द्विशतक केलं आहे. हैदराबादमध्ये बांगलादेशविरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्यात विराट कोहलीने या नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. ही सलग चौथी मालिका आहे ज्यामध्ये विराट कोहलीने द्विशतक केलं आहे. याअगोदर सर डॉन ब्रॅडमॅऩ आणि राहुल द्रविड यांनी सलग तीन कसोटी मालिकांमध्ये द्विशतक करण्याचा विक्रम केला आहे.

भारताकडून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर आणि विरेंद्र सेहवागने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त सहा द्विशतक केली आहेत. तर राहुल द्रविडने पाच वेळा द्विशतक केलं आहे.