Home क्रीडा स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला राजाश्रयाचीही गरज

स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला राजाश्रयाचीही गरज

0

गोंदिया,दि.08 : स्वदेळी खेळोत्तेजक मंडळाचा इतिहास जुना असून या मंडळाची स्थापना ८० वर्षांपूर्वी संयुक्त जिल्हा असलेल्या काळाची आहे. या मंडळाच्या माध्यमातून स्वदेशी खेळ दरवर्षी शालेय विद्यार्थ्यांकडून खेळविले जातात. त्यातून विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते, असे मत आमदार तथा लोकलेखा समितीचे अध्यक्ष गोपालदास अग्रवाल यांनी केले.
स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाच्या वतीने आयोजीत तालुका क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार विजय रहांगडाले होते. स्वागताध्यक्ष माधुरी हरिणखेडे होत्या. पाहुणे म्हणून जि.प. सदस्य रमेश अंबुले, पं.स. उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, सरपंच रविकुमार पटले, उपसरपंच देवलाल टेंभरे, पं.स. सदस्य जयप्रकाश बिसेन, पं.स. सदस्य प्रकाश पटले, दांडेगावच्या सरपंच बेबीनंदा चौरे, सहेसपूरचे सरपंच हितेश पतेह, एकोडी येथील ग्रामपंचायत सदस्य, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी तसेच परिसरातील लोकप्रतिनिधी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार अग्रवाल यांनी, खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी व शिक्षकांचा सलोखा दिसून येतो. तसेच सदर कार्यक्रम करण्याकरिता लोकसहभागाचा निधी अपुराच पडत असतो. त्यामुळे स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाला शासनाचे आर्थिक सहकार्य मिळाले तर या खेळांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. त्याकरिता सरकारकडे मागणी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या वेळी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन उद्घाटक आमदार अग्रवाल व आ. रहांगडाले यांच्या हस्ते स्वदेशी खेळोत्तेजक मंडळाचे ध्वजारोहण करण्यात आले. या तालुकास्तरीय क्रीडा सत्रात १३ केंद्रांपैकी १५ शाळांचा सहभाग होता. त्यांच्यामार्फत उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.प्रास्ताविक स्वदेशी खेळोत्तेजक मंडळ सचिव चंद्रशेखर दमाहे यांनी मांडले. संचालन उपाध्यक्ष यु.पी. बिसेन यांनी केले. या तालुकास्तरीय क्रीडा व सांस्कृतीक कार्यक्रमासाठी केंद्रांतर्गत येणाºया सर्वच शाळांतील शिक्षक व कर्मचाºयांनी सहकार्य केले.

Exit mobile version