Home यशोगाथा चीनने बनवली १० सेकंदात चार्ज होणारी बस

चीनने बनवली १० सेकंदात चार्ज होणारी बस

0

बीजिंग- जगातील सर्वात वेगाने चार्ज होणारी बस चीनने बनवली आहे. अवघ्या दहा सेकंदात ही बस चार्ज होते. या बसचे शुभारंभ निगबो शहरात गेल्या मंगळवारी झाला.
येत्या तीन वर्षात वीजेवर चालणा-या १ हजार २०० बसेस सुरू करण्यात येणार आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर ही बस पाच किलोमीटर चालेल. त्यानंतर तिला पुन्हा चार्जिग करावे लागणार आहे, अशी माहिती झुझोऊ इलेक्ट्रीक लोकोमोटिव्ह कंपनीचे अध्यक्ष झोऊ क्विंघी यांनी दिली.
या वीजेवर चालणा-या बसमुळे ३० ते ५० टक्के वीज वाचणार आहे. या बसमधील कॅपॅसिटर दहा लाख वेळा चार्ज केल्यानंतरही चालू शकणार आहे, अशी माहिती क्विंघी यांनी दिली.

Exit mobile version