Home Top News जम्मू काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमध्ये ४ दहशतवाद्यांचा खात्मा

0

वृत्तंसंस्था
श्रीनगर, दि. ३ – जम्मू काश्मीरमधील हंदवाडा येथे सैन्य व दहशतवाद्यांमध्ये सुरु असलेली चकमक गुरुवारी सकाळी संपली असून लपून बसलेल्या चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सैन्याला यश आले.

बुधवारी संध्याकाळी हंदवाडा येथे दहशतवादी व सैन्याच्या जवानांमध्ये चकमक सुरु झाली होती. या चकमकीत सैन्याचा एक जवान शहीद झाला तर तीन जवान जखमी झाले. गुरुवारी सकाळी ही चकमक संपली असून सैन्याने चारही दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. घटनास्थळावरुन मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. गेल्या आठवडाभरात जम्मू काश्मीरमध्ये चकमकीची ही तिसरी घटना आहे.

Exit mobile version