Home Top News इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, अॅस्ट्रोसॅटची यशस्वी प्रक्षेपण

इस्त्रोच्या शिरपेचात मानाचा तुरा, अॅस्ट्रोसॅटची यशस्वी प्रक्षेपण

0

वृत्तसंस्था
श्रीहरिकोटा, दि. २८ – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने अंतराळ मोहीमेत पुन्हा एकदा भारताचा झेंडा रोवला आहे. भारतीय बनावटीच्या अॅस्ट्रोसॅट या उपग्रहाचे सोमवारी सकाळी यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले असून अॅस्ट्रोसॅट ही भारताची अंतराळातील पहिली वेधशाळा आहे. अंतराळात वेधशाळा असलेला भारत हा चौथा देश आहे.

सोमवारी सकाळी दहा वाजता श्रीहरिकोटा येथील अवकाळतळावरुन पीएसएलव्ही सी – २० या रॉकेटव्दारे ‘अॅस्ट्रोसॅट’चे प्रक्षेपण करण्यात आले. अॅस्ट्रोसॅटचे वजन १,५१३ किलो असून अॅस्टोसॅटसोबत आणखी सहा विदेशी उपग्रहांचेही प्रक्षेपण करण्यात आले. खगोलीय घटकातील विविध फ्रिक्वेन्सीचे एकाच वेळी निरीक्षण करणे अॅस्ट्रोसॅटच्या माध्यमातून शक्य होणार आहे. इस्त्रोसोबत पुण्यातील आयुका, टाटा मुलभूत संशोधन संस्था, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अॅस्ट्रोफिजिक्स, रामन रिसर्च सेंटर या संस्थाही या मोहीमेत सहभागी होत्या.

Exit mobile version