Home Top News ७/११ बॉम्बस्फोटातील पाच दोषींना फाशी

७/११ बॉम्बस्फोटातील पाच दोषींना फाशी

0

मुंबई दि. ३० – ११ जुलै २००६ रोजी मुंबईत उपनगरीय लोकलमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणात दोषी ठरलेल्या बारा आरोपींना विशेष मोक्का न्यायालयाने आज शिक्षा सुनावली.
फाशीची शिक्षा झालेले दोषी – कमल अन्सारी, फैसल शेख, एतशाम सिद्दीकी, नावीद खान आणि असिफ खान,जन्मठेप झालेले दोषी – माजीद महम्मद शफी, मुझम्मील शेख, सुहैल शेख ,जमीर शेख, तनवीर अन्सारी, साजिद अन्सारी यांचा समावेश आहे.
आठ आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी सरकारी पक्षाने केली होती. मात्र न्यायालयाने लोकलमध्ये बॉम्ब ठेवणा-या पाच दोषींना फाशी सुनावली. कमल अन्सारी, तनवीर अन्सारी, फैसल शेख, एतशाम सिद्दीकी, महम्मद अली शेख, साजिद अन्सारी, नावीद खान आणि असीफ बाशीर या आठ दोषींना मृत्यूदंड सुनावण्याची सरकारी वकिलांनी मागणी केली होती.

दोषी ठरलेले गुन्हेगार भविष्यात सुधारण्याची अजिबात शक्यता नाही. सरकारी पक्षाच्या वकिलांनी आपण केलेल्या कृत्याबद्दल त्यांच्या मनात कुठलीही पश्चातापाची भावना नसल्याचा युक्तीवाद केला होता.

Exit mobile version