Home Top News पुण्यनगरीच्या मुंबई संपादकाना नक्षल्यांच्या नावे धमकीपत्र

पुण्यनगरीच्या मुंबई संपादकाना नक्षल्यांच्या नावे धमकीपत्र

0

विशेष प्रतिनिधी
मुंबई,दि.1-राज्यातील पुर्व विदर्भात फोफावलेल्या नक्षलचळवळीला आता खीळ बसू लागली असून पोलिसांनी हळूहळू नक्षल्यांच्या खात्मा करण्यास सुरवात केली आहे.याच अनुषगांने वृत्तपत्रात बातम्याही येत असतात.पुण्यनगरी या वृत्तपत्रात सुध्दा पोलीस नक्षली चकमकीत नक्षल्यांच्या खात्मा झाल्याचे वृत्त प्रकाशित झाले आहे.यावर तथाकथीत मकरंद साने या नक्षलवाद्याने मुंबई पुण्यनगरीचे संपादक संजय मलमे यांना पत्र पाठवून पोलीस चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा असा उल्लेख करण्यास विरोध केला आहे.तसेच अन्यथा कार्यालयात येऊन खात्मा करण्याची धमकी दिली आहे.याप्रकरणी मलमे यांनी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.या प्रकरणाचा मंत्रालय पत्रकार संघ,विधीमंडळ वार्ताहर संघ तसेच उल्हासनगर मराठी पत्रकार संघाने निषेध नोंदवित गृह विभागाने याप्रकरणाची गंभीरपणे चौकशी करावी अशी मागणी केली आहे.

Exit mobile version