राज्याच्या मुख्यसचिवपदी सीताराम कुंटे

0
27

मुंबई : गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांची राज्याचे मुख्य सचिवपदासाठी वर्णी लागली आहे. त्यांच्या जागी गृह विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी मनुकुमार श्रीवास्तव यांना संधी मिळाली आहे. दरम्यान, येत्या नोव्हेंबरमध्ये कुंटे नवृत्त होणार आहेत. त्यामुळे, नवीन मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ हा नऊ महिन्यांचा असणार आहे. राज्याचे मुख्य सचिव संजय कुमार हे सेवानवृत्त झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य सचिवपदी सीताराम कुंटे यांना संधी मिळाली आहे. सध्या संयुक्त राष्ट्रसंघात प्रतिनियुक्तीवर गेलेले प्रवीणसिंह परदेशी आणि सीताराम कुंटे यांच्यात मुख्य सचिवपदासाठी चुरस होती. त्यासाठी जोरदार लॉबिंग सुरू होते. अजय मेहता यांचा मुख्य सचिवपदाचा कार्यकाळ ३0 जून रोजी संपल्यानंतर संजय कुमार हे राज्याचे मुख्य सचिव बनले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खास र्मजीतील असलेल्या मेहता यांना मुदतवाढ मिळणार असल्याची चर्चा होती. पण, त्यांच्या कार्यपद्धतीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांची खप्पार्मजी होती. त्यामुळे त्यांना पुन्हा मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडीतील काही मंत्र्यांचा कडाडून विरोध केला. कुंटे नोव्हेंबर, २0२१मध्ये नवृत्त होत आहेत. नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव प्रविण परदेशी यांच्याही नावाची चर्चा होती. ते सन १९८५च्या बॅचचे असून, तेही नोव्हेंबर, २0२१मध्ये नवृत्त होत आहेत.