
30 सप्टेंबर पर्यत दिली मुदत
नवीदिल्ली,दि.11- देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बॅंर असलेल्या भारतीय स्टेट बॅंक ऑफ इंडियाने आपल्या सर्व खातेदारांना येत्या 30 सप्टेंबरपूर्वी आपले पॅनकार्ड आधार कॉर्डशी लिंक करण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा जे खातेदार आपले पॅनकॉर्ड आधारकॉर्डशी लिंक करणार नाही, अशा खातेदारांना बॅंकेच्या सेवा मिळण्यात अडचणी येऊ शकतात, अशा सूचना बॅंकेनी दिल्या आहेत.
सरकारने आपल्या नागरिकांना आपले पॅनकार्ड आधारकॉर्डला लिंक करण्याची मुदतवाढ येत्या 30 सप्टेंबरपर्यंत वाढविली आहे. यामुळे एसबीआय च्या प्रशासनाने आपल्या सर्व खातेधारकांनी तसे करण्याचे आवाहन केले आहे.
खातेदार आयकर विभागाच्या वैबसाईटवर जाऊन वा एसएमएस द्वारे आधार-पॅन लिंक प्रक्रिया पूर्ण करू शकतात. याशिवाय निष्क्रिय असलेले पॅनकार्ड पुन्हा सक्रिय करण्यासाठी आपल्या नोंदणीकृत मोबाईल वरून संदेश करून आपले पॅनकार्ड पुन्हा सक्रिय करू शकतात. यासाठी पॅन कार्डवरील नंबर स्पेस देऊन आपले आधारकार्डवरील नंबर मोबाईलच्या संदेशामध्ये टाईपकरून 56768 किंवा 56161 या नंबर वर पाठवावा.