दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत एका अधिकाऱ्यासह 5 जण शहीद

0
34

श्रीनगर,- जम्मू आणि काश्मीरच्या राजौरी येथे दहशतवादी आणि सैनिकांमध्ये धुमश्चक्री उडाली. यात एका अधिकाऱ्यासह इतर 4 जवान शहीद झाले आहेत. पीर पंजाल येथे सोमवारी दहशतवादविरोधी मोहिम सुरू होती. त्यात चकमक उडाली आणि त्यामध्ये ज्युनिअर कमीशन्ड ऑफिसर (JCO) तसेच 4 जवान शहीद झाले.

काश्मीरात पूंछमध्ये सुद्धा दहशतवादी आणि सैनिकांमध्ये चकमक उडाली. संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळपासून या ठिकाणी गोळीबार सुरू आहे. पूंछ येथील सुरनकोट परिरसात दहशतवादी दबा धरून बसल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याच आधारे परिसराला घेराव टाकून शोध मोहिम सुरू करण्यात आली. परंतु, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर याचे चकमकीत रुपांतर झाले.

याच प्रकारे बांदीपुरा येथे सुद्धा चकमक घडली. त्यात एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव इम्तियाज अहमद डार होते. लश्कर-ए-तोयबाचा सदस्य होता. काश्मीरचे पोलिस महानिरीक्षक विजय कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे, मारल्या गेलेला दहशतवादी नुकतेच झालेल्या खुनाचा आरोपी देखील होता.

संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, अनंतनागमध्ये सुद्धा चकमक घडून आली. यामध्ये एक दहशतवादी मारल्या गेला. तर एक पोलिस जवान जखमी आहे. ताज्या माहितीनुसार, आणखी काही दहशतावदी याच परिसरात अजुनही लपले आहेत. त्यांना शोधून काढण्यासाठी सुरक्षा रक्षकांचे कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.