Home Top News जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला;जवान शहीद

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला;जवान शहीद

0

श्रीनगर दि. 25 – जम्मू-काश्मीरमधील तंगधारमधील लष्कराच्या गोरखा रायफल कॅम्पवर दहशतवाद्यांनी बुधवारी हल्ला केला आहे. हल्ल्यात एक जवान शहीद झाला असून चार जण जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. दहशतवादी व जवानांमध्ये चकमक सुरु आहे. 7-8 दहशतवादी असण्याची शक्यता आहे. दहशतवादी अंदाधूंद गोळीबार करत आहेत.

तंगधार हा भाग लाइन ऑफ कंट्रोलला (एलओसी) लागून आहे. आत्मघातकी हल्ल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यानंतर कॅम्पमध्ये आग लागली आहे.

दुसरीकडे, लष्कराच्या जवानांनी बुधवारी सकाळी पूंछमध्ये सर्च ऑपरेशन राबवले. यात मोठ्या प्रमाणात स्फोटके व पाकिस्तानी करेंसी जप्त करण्‍यात आली आहे.

दरम्यान जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यात मागील 10 दिवसांपासून लष्कर आणि स्थानिक पोलिसांनी ऑपरेशन एन्काउंटर सुरु केले आहे.

Exit mobile version