Home Top News इंदूर- छिंदवाडा बसला भीषण अपघात, बस उलटून 15 ठार

इंदूर- छिंदवाडा बसला भीषण अपघात, बस उलटून 15 ठार

0

वृत्तसंस्था

भोपाळ,, दि. १५– मध्यप्रदेशातील होशंगाबादमधील लांगा बम्हौरीजवळ आज मंगळवारी सकाळी 5-6 वाजेदरम्यान बसचा भीषण अपघात झाला आहे. बस उलटून झालेल्या अपघातात 15 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 35 जखमी झाले आहेत. इंदूरहून छिंदवाड्याला निघाली होती.  इंदूरहून छिंदवाडा जात होती बस.यामध्ये 85 प्रवाशी होते. त्यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. जखमींना तातडीने भोपाळ येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. होशंगाबादचे जिल्हाधिकारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

Exit mobile version