राज्यसभेसाठी आमदारांचे मतदान पुर्ण झाले आहे. सायंकाळी 5 वाजता मतमोजणी होईल. काँग्रेसचे अमर राजूरकर यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या मतदानावर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसने निवडणुक आयोगाकडे आक्षेप नोंदवला आहे.
- नवाब मलिकांना हायकोर्टाचा पुन्हा झटका, विशेष पीएमएलए न्यायालयाचा निकाल कायम ठेवला.
- हायकोर्टाच्या निकालानंतर नवाब मलिकांनी याचिकेतील जामिनाचा मुद्दा काढून केवळ बंदोबस्तात मतदानाची परवानगी देण्याची मागणी करत पुन्हा नव्याने याचिका केली. मात्र, ही याचिका ऐकूण घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे नवाब मलिकांना या निवडणुकीत मतदान करता येणार नाही, हे स्पष्ट झाले आहे.
- शिवसेनेच्या 42 आमदारांची पहिल्या पसंतीची मते संजय राऊत यांना
- संजय पवार यांना शिवसेनेच्या 13 आमदारांची पहिल्या पसंतीची मते
- राष्ट्रवादीची 2 आणि काँग्रेसची 9 मते संजय राऊतांना
- विधानभवनात शिवसेना व काँग्रेस नेत्यांची बैठक सुरू, दोन्ही पक्षांच्या मतदानानंतर आकडेवारीवर खल
- एमआयएमच्या दोन आमदारांचा काँग्रेसला पाठिंबा
- भाजपकडून जितेंद्र आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांच्या मतांवर आक्षेप, मात्र अधिकाऱ्यांनी आक्षेप फेटाळला
मतदानाचा पहिला मान
आज निवडणुकीमध्ये मतदानाचा पहिला मान राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांना मिळाला. सर्वात पहिले मतदान भरणे यांनी केले. मतदान झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले की, महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पहिले मतदान करण्याचा मान मिळणे हा पहिला कौल आमच्या बाजूने लागला आहे. आज दिवसभर महाविकास आघाडीचाच बोलबाला राहणार आहे. आमचे सर्वच्या सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने निवडून येणार आहेत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

सायंकाळी 7 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होणार
आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत आमदारांना मतदान करता येणार आहे. त्यानंतर मतमोजणी होऊन सांयकाळी 7 वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक उमेदवाराला पसंतीक्रम (1, 2, 3, 4, 5 आणि 6) दिला जातो. 42 किंवा अधिक सदस्यांनी उमेदवाराला प्रथम पसंती दिल्यास तो निवडून येतो. विधानसभेतील एकूण 288 सदस्यांपैकी शिवसेनेच्या एका आमदाराचे निधन झाले असून अनिल देशमुख-नवाब मलिक यांना मतदान करण्याची परवानगी मिळाली नाही तर मविआला फटका बसण्याची शक्यता आहे.
असे आहे पक्षीय बालाबल
आघाडी + – १६७
शिवसेना – ५५
राष्ट्रवादी – ५१ (दोन सदस्य तुरुंगात)
काँग्रेस – ४४
अपक्ष – ९
किशोर जोरगेवार (चंद्रपूर), गीता जैन (मीरा भाईंदर), नरेंद्र भोंडेकर (भंडारा), आशिष जयस्वाल (रामटेक), संजय शिंदे (करमाळा), चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर), मंजुळा गावित (साक्री), विनोद अग्रवाल (गोंदिया), राजेंद्र यड्रावकर (शिरोळ).
छोटे पक्ष – ८
समाजवादी पार्टी – २, प्रहार जनशक्ती पार्टी – २, माकप – १, शेकाप – १, स्वाभिमानी पक्ष – १, क्रांतिकारी शेतकरी पार्टी – १
साधारणत: संजय पवार विजयी होऊ शकतात असं सध्याच्या आकडेवारीवरुन दिसून येतंय.
पहिल्या पसंतीची मतं
शिवसेना – 13
काँग्रेस – 2
राष्ट्रवादी – 9
माकप – 1
शेकाप – 1
शंकरराव गडाख – 1
बच्चू कडू (प्रहार) – 2
स्वाभिमानी – 1
सपा – 2
एमआयएम – 2
मंजुळा गावित
गीता जैन
राजेंद्र यड्राव्हकर
आशिष जैस्वाल
चंद्रकांत पाटील
नरेंद्र भोंडेकर
विनोद अग्रवाल
किशोर जोरगेवार
संजय मामा शिंदे
कोण आहेत संजय पवार?
शिवसनेचे कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख असलेले संजय पवार हे गेल्या 30 वर्षांपासून शिवसेनेत सक्रिय आहेत. गेल्या 9 वर्षांपासून ते कोल्हापूर जिल्हाप्रमुख म्हणून सक्रिय आहेत. स्थानिक राजकारणावर त्यांची मजबूत पकड आहे. कोल्हापुरात पक्षबांधणीचं जोमानं काम केलं. आण्णासाहेब पाटील महामंडळाचे ते उपाध्यक्ष आहेत. एवढंच नाहीतर, तीन वेळा कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले होते. शिवसैनिक ते नगरसेवक आणि त्यानंतर जिल्हाप्रमुख असा सेनेतील त्यांचा प्रवास. उच्चशिक्षित आणि संघटन कौशल्य असल्यानं पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांमध्ये संजय पवार यांच्या नेतृत्त्वाची छाप आहे. तसेच, एक कडवट शिवसैनिक म्हणून त्यांची पंचक्रोशीत ओळख आहे. यासोबतच, सिमा प्रश्नी आंदोलनताही तब्बल 30 वर्षे संजय पवार सहभागी आहेत.
जितेंद्र आव्हाड यांनी दिलं स्पष्टीकरण
आदित्य ठाकरेंच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता
आदित्य ठाकरे यांनी मतदान करताना त्यांच्या मतपत्रिकेवर निवडणूक आयोगाचा शिक्का नव्हता. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची पहिली मतपत्रिका बाजूला ठेवण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने त्यांना दुसरी मतपत्रिका दिली त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला. पहिल्या मतपत्रिकेवर शिक्का का नव्हता याचा तपास निवडणूक अधिकारी करतील