
Maharashtra Minister Aaditya Thackeray along with his mother Rashmi Thackeray and brother Tejas Thackeray follow Maharashtra CM Uddhav Thackeray as he leaves from his official residence in Mumbai. pic.twitter.com/fOfq9bZN1n
— ANI (@ANI) June 22, 2022
मुंबई: ज्यांना जायचं आहे त्यांनी जा… असं भावनिक वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. ‘वर्षा’वरून ‘मातोश्री’कडे जाताना उद्धव ठाकरे असं बोलले आणि निघून गेले. उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळतंय.
#WATCH Shiv Sena workers gather outside Maharashtra CM Uddhav Thackeray's residence 'Matoshree' to express their support, in Mumbai pic.twitter.com/WtpciHr5ZX
— ANI (@ANI) June 22, 2022
तिकडून काय सांगता, तोंडावर सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी तसेच बंडखोर आमदारांशी संवाद साधला. तुम्ही इकडे या, आणि मला सांगा, मुख्यमंत्रीपदासाठी तुम्ही लायक नाही, मी लगेच राजीनामा देतो असं उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर आपण मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेला ‘वर्षा’ बंगला आजच सोडणार असल्याचं जाहीर केलं. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थान सोडलं.
#WATCH Maharashtra CM Uddhav Thackeray along with his family leaves from his official residence, amid chants of "Uddhav tum aage badho, hum tumhare saath hain" from his supporters.#Mumbai pic.twitter.com/m3KBziToV6
— ANI (@ANI) June 22, 2022
वर्षा निवासस्थान सोडताना त्यांनी एकच वाक्य उच्चारलं, ज्यांना जायचं आहे त्यांनी जा… मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असं म्हणाले आणि निघून गेले.