देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी : जे.पी. नड्डा

0
26


मागील बराच दिवस महाराष्ट्रात सुरु असलेल्या सत्तासंघर्षात आज एक मोठी घोषणा झाली असून शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांनी भाजपसोबत मिळून सरकार स्थापन करणार असल्याची घोषणा केली. स्वत:  देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा केली. तसंच मंत्रीमंडळात स्वत: कोणतच पद घेणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं. पण भाजपकडून फडणवीस यांनी सरकारमध्ये असावं आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांनी ही मागणी केली आहे.