Home Top News लंकेच्या राष्ट्रपती भवनावरील कब्ज्याचे PHOTOS:शाही स्विमिंग पुलात निदर्शकांचे स्नान

लंकेच्या राष्ट्रपती भवनावरील कब्ज्याचे PHOTOS:शाही स्विमिंग पुलात निदर्शकांचे स्नान

0

कमालीच्या आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेतील स्थिती आता पूर्णतः हाताबाहेर गेली आहे. सरकारने एका दिवसापूर्वीच देश दिवाळखोरीत गेल्याची घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी नागरिकांचा संताप अनावर झाला. हजारो श्रीलंकन नागरिकांनी रस्त्यांवर उतरुन सरकारविरोधात आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे. त्यांच्या अंगात काळे-निळे कपडे व हातात राष्ट्रध्वज आहे.

सरकारी धोरणांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी अखेरीस कोलंबोतील राष्ट्रपती भवनाची घेराबंदी केली. यामुळे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांना स्वतःचे सरकारी निवासस्थान सोडून पळ काढावा लागला. त्यानंतर जनतेने राष्ट्रपती भवनाचा ताबा घेतला. सद्यस्थितीत हे निदर्शक भवनातील हॉल, आलिशान खोल्या व एवढेच नाही तर स्विमिंग पुलात उतरुन मनसोक्त आनंद घेत आहेत. दुसरीकडे, नौदलाच्या जहाजारावर गोटबायांचे सामान ठेवण्याचे फुटेज उजेडात आले आहे.

12 फोटोंत पहा श्रीलंकेतील जनांदोलन…

हे श्रीलंकेचे राष्ट्रपती भवन आहे. त्याच्यापुढे आंदोलक उभे आहेत. हजारो लोकांचा हा जमाव देशातील विविध शहरांमधून कोलंबोला पोहोचला आहे.
हे श्रीलंकेचे राष्ट्रपती भवन आहे. त्याच्यापुढे आंदोलक उभे आहेत. हजारो लोकांचा हा जमाव देशातील विविध शहरांमधून कोलंबोला पोहोचला आहे.
राष्ट्रपती भवनात प्रवेश करताना जागा मिळेल तेथून आंदोलक भिंती, दरवाजांवर चढले. त्यानंतर श्रीलंकेचा ध्वज हाती घेऊन घोषणाबाजी केली.
आंदोलकांनी राष्ट्रपती भवनावर कब्जा केला. सरकारी निवासस्थानाच्या मेन गेटवर चढून लोकांनी वाढत्या महागाईचा निषेध केला.
राष्ट्रपती भवनात प्रवेश केल्यानंतर काही जणांनी तेथील स्विमिंग पूलमध्ये उड्या घेतल्या. तिथे त्यांनी पोहतानाचे फोटो काढले व व्हिडिओही तयार केले. येथे बरीच गर्दी जमली होती.
काही आंदोलक पोलिसांच्या वाहनांवरही चढले. त्यानंतर त्यांनी सरकारविरोधात ‘गोटा-गो-गामा’ चे नारे दिले.
रस्त्यावर उतरलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधूराच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेतही गोळीबार केला.
पोलिसांनी निदर्शकांना रोखण्यासाठी पाण्याच्या फवाऱ्यांचा मारा केला. पण, त्यानंतरही निदर्शक मागे हटले नाही.
रस्त्यावर आंदोलन करणारा एक व्यक्ती ब्रेडचा तुकडा दाखवत आहे. हे आंदोलन एकप्रारे रोजीरोटीसाठी केले जात आहे. गत काही महिन्यांत श्रीलंकेची आर्थिक स्थिती एवढी दयनिय झाली आहे की, लोकांना एकवेळचे जेवणही मिळत नाही.
राजधानी कोलंबोत उग्र आंदोलन झाले. पोलिसांसोबतच्या झडपेत अनेकजण जखमी झाले. छायाचित्रात एका व्यक्तीच्या डोक्यातून रक्त वाहत असल्याचे दिसून येत आहे. त्याला आंदोलक उचलून घेऊन जात आहेत.
स्थानिक माध्यमांनी प्रसारित केलेल्या व्हिडिओ फुटेजमध्ये राष्ट्रपती गोटबाया यांचे सामान नौदलाच्या जहाजावर ठेवण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनी देशातून पळ काढल्याचा दावा केला जात आहे.
आंदोलकांनी देशातील विद्यमान आर्थिक संकटासाठी राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांना जबाबदार धरत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
आर्थिक संकटामुळे लंकन जनतेला दैनंदिन गरजेच्या वस्तूही मिळणे दुरापास्त झाले आहे. याविषयी जनतेत कमालीचा रोष आहे.

Exit mobile version