नागपूरमध्ये भीषण अपघात; दुचाकीवरून चौघे 70 ते 80 फूट उंचीवरून खाली, मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचा समावेश

0
108

नागपूर- नागपूरच्या सक्करदरा परिसरात भीषण अपघात घडला आहे. या दुर्घटनेत दुचाकीवरील चौघे जण सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खाली फेकले गेले आणि त्यांचा मृत्यू झाला. माहितीनुसार,  मृतांमध्ये 2 चिमुरड्यांचा समावेश आहे.

नागपूरमध्ये रात्री सव्वा दहा वाजेच्या सुमारास सक्करदरा फ्लायओवरवर अनियंत्रित चारचाकी कारने दोन दुचाकींना जबर धडक दिली. त्यामुळे दुचाकीवरील चौघे जण फ्लायओवरच्या खाली फेकले गेले. दुचाकीवरील चौघे सुमारे 70 ते 80 फूट उंचीवरून खालच्या रस्त्यावर फेकले गेल्याने चौघेजण गंभीर जखमी झाले आहे. त्यांना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

त्या चौघांचाही मृत्यू
पोलिसांनी धडक देणाऱ्या चार चाकी वाहनाच्या चालकाला ताब्यात घेतले असून तो कार मालकाचा ड्रायव्हर असल्याची माहिती आहे. फ्लायओव्हर वरून खाली फेकले गेलेल्या आणि गंभीर जखमी असलेल्या चौघांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृत पावलेल्यांमध्ये एक पुरुष, एक स्त्री आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. तर अनियंत्रित चारचाकी वाहनाने धडक दिलेल्या दुसऱ्या दुचाकी वर बसलेले चौघेजण गंभीर जखमी आहे.