Home Top News दहशतवादी हल्ल्यात कॅप्टनसह 2 जवान हुतात्मा

दहशतवादी हल्ल्यात कॅप्टनसह 2 जवान हुतात्मा

0

पीटीआय

श्रीनगर – येथील श्रीनगर- जम्मू महामार्गावर पाम्पोर येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर केलेल्या हल्ल्यामध्ये एका कॅप्टनसह दोन जवान हुतात्मा झाले, तर एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात दहाजण जखमी झाले आहेत. हल्लेखोर दहशतवाद्यांनी नजीकच्या सरकारी इमारतीमध्ये आश्रय घेतला असून, अद्याप चकमक सुरु आहे.

पाम्पोर येथे शनिवारी रात्रीपासून दहशतवाद्यांसोबत चकमक सुरु आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात 22 वर्षीय कॅप्टन पवन कुमार हुतात्मा झाले आहेत. तर, अन्य दोन जवानही हुतात्मा झाले आहेत.

Exit mobile version