Home Top News नक्षलवाद्यांची वन कर्मचाऱ्यांना धमकी…..वृक्ष लागवड केली तर

नक्षलवाद्यांची वन कर्मचाऱ्यांना धमकी…..वृक्ष लागवड केली तर

0

गडचिरोली : सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर परिसरात वन कर्मचाऱ्यांकडून केल्या जात असलेल्या वृक्षलागवडीला नक्षलवाद्यांनी विरोध दर्शवत हे काम करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना जिवाला मुकावे लागेल, अशी धमकी पत्रकांमधून दिली आहे.गावातील आंबेडकर चौक परिसरात ही लाल शाईने लिहिलेली पत्रके आढळून आली आहेत. त्यात वनविभागाबद्दल रोष व्यक्त करण्यात आला. वनविभागाची दादागिरी बंद करा, वनविभाग गरीब लोकांच्या जमिनीवर वृक्षलागवड करत आहे. ही दादागिरी बंद केली नाही तर मृत्युदंड दिला जाईल, असा मजकूर भाकपा (माओवादी) यांच्या नावे काढलेल्या त्या पत्रकांमध्ये आहे.

त्यामुळे वन कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. बऱ्याच वर्षांनंतर नक्षलवाद्यांनी वन विभागाविरोधात पत्रक काढल्याने परिसरात विविध चर्चांना ऊत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सिरोंचा वनविभागात अवैध वृक्षतोड आणि तस्करी होत असल्याचे काही प्रकरणे समोर आली होती.

Exit mobile version