बल्लारशाह रेल्वे स्थानकाचा पादचारी पूल कोसळला!13 जण जखमी

0
43

बल्लारपूर,-बल्लारशाह रेल्वे स्थानकाच्या जुन्या पादचारी लोखंडी पुलाचा काही भाग रविवार, 27 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी अचानक कोसळला. त्यावेळी या पुलावरून काही जण पायी जात असल्याने तेही  खाली रूळावर कोसळले. या भीषण अपघातात एकूण 13 जण जखमी झालेत. पैकी तिघे जण गंभीर आहेत. एका महिलेची स्थिती नाजूक असल्याचे कळते.ते सर्व जखमींना चंद्रपूर येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात
उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.साची निलेश पाटील, प्रेम तितरे, निधी मनोज भगत, छाया मनोज भगत, चैतन्य मनोज भगत, नयन बाबाराव भीमनवार, राधेश्याम सिंग,अनुराग खरतड, स्वीटी खरतड, विक्की जयंत भीमलवार, पूजा सोनटक्के, ओम सोनटक्के असे जखमींचे नावे आहेत. तब्बल पाच ते सहा रुग्णवाहिकांतून सर्व जखमींना जिल्हा सामान्य रूग्णालयात दाखल करण्यात आले. या रेल्वे स्थानकावर 5 प्लॅटफॉर्म आहेत. त्यातील 1 आणि 2 क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मला जोडणारा पुलाचा भाग कोसळला. सुदैव म्हणजे, काही वेळापूर्वीच या दरम्यानच्या रूळावर काजीपेठ-पुणे रेल्वेगाडी निघून गेली होती. अन्यथा भीषण दुर्घटना घडली असती.बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयाचाही भोंगळ कारभार या अपघाताच्या बिकट प्रसंगातून निदर्शनास आला.जखमींना तातडीने आरपीएफचे जवान तसेच नागरिकांनी बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात हलविले होते.परंतु,तेथे एकही डॉक्टर उपलब्ध नसल्याने जखमींची गैरसोय झाली. तेथे वैद्वैयकीय अधिकार्‍यांशी संपर्क साधण्यात आला, त्यांनी तातडीने जखमींना चंद्रपूर रुग्णालयात
हलविण्यात यावे, असे सांगितले.

बल्लारशाह रेल्वे फुट ओव्हरब्रिज दुर्घटना दुर्देवी, सखोल चौकशी करावी-हंसराज अहीर
रुग्णालयात जावून जखमींची भेट घेतली

चंद्रपूर:- बल्हारशाह रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हरब्रिज कोसळून झालेल्या दुर्घटनेला मध्य रेल्वेचे वरीष्ठ अधिकारी जबाबदार असल्याचे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी म्हटले आहे. सदर फुट ओव्हर ब्रिज अतिशय जिर्णावस्थेत असल्याने त्याची दुरुस्ती करण्याची मागणी सातत्याने करण्यात येत  होती. रेल्वे यात्री संघटनेद्वारासुध्दा याकडे लक्ष वेधल्या जात असतांना वरिष्ठांनी याकडे दुर्लक्ष केल्यानेच दुर्घटना घडली असावी त्यामुळे या दुर्घटनेची सखोल चैकशी करुन दोषी अधिकाऱ्यांवर  कारवाई करावी असेही अहीर यांनी म्हटले आहे.
रेल्वे प्रवाशांना रेल्वे संदर्भात माहिती देण्यासाठीची उद्घोषणा अगदी वेळेवर केली जात असल्याने प्रवासी गाडी पकडण्यासाठी एका फलाटावरुन दुसऱ्या फलाटावर धावपळ करीत या फुट ओव्हरब्रिजने जातात. त्यामुळे प्रवाशांची क्षमता जास्त झाल्याने सदर प्रकार घडण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेत 2 प्रवासी अत्यव्यस्थ व 11 जखमी झाले आहेत.  या दुर्घटनेतील जखमींची जिल्हा सामान्य रुग्णालयात जावून अहीर यांनी भेट घेवून त्यांच्या प्रकृतीची आस्थेने चैकशी केली. उपस्थित वैद्यकीय अधिका़ऱ्यांशी  जखमींवर होत असलेल्या उपचाराबाबत माहिती जाणून घेतली. यावेळी अधिष्ठाता डाॅ. नितनवरे, जिल्हा शल्य चिकीत्सक डाॅ बंडू रामटेके, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहीर, ब्रिजभूषण पाझारे, राहुल सुर्यवंशी व अन्य वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.