विधान भवनाच्‍या गेटवरच महिलेचा आत्‍महदहनाचा प्रयत्‍न

0
27

नागपूर – हिवाळी अधिवेशनातील सभागृहाचे कामकाज सुरू असताना विधान भवनाच्या गेट समोरच महिलेने अंगावर ज्वलनशील पदार्थ घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला.नागपूर अधिवेशन सध्या सुरू आहे. आज दुपारच्या वेळेस सोलापूरच्या कविता चव्हाण यांनी अचानक विधानसभेच्या गेट समोर रस्त्यावर येत बॉटलमध्ये आणलेले ज्वलनशील पदार्थ स्वतःच्या अंगावर टाकत आत्मदहनाचा प्रयत्न केला. वारकऱ्यांबद्दल आणि महापुरुषांबद्दल अपशब्द बोलले जात आहे. या सर्वांचा निषेध म्हणून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे ते सांगतात.

सरकारजवळ कोणते मुद्दे राहिलेले नाही. म्हणून महापुरुषांबद्दल असे अपशब्द बोलले जात आहेत. मात्र महापुरुषांनी केलेल्या कार्यामुळेच आज तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. हे राज्यकर्ते विसरले, असे कविता यांनी म्हटले आहे. पोलिसांनी वेळीस त्यांना पकडल्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. सध्या पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस पुढील तपास करीत आहे