हळवल फाट्यावरील अपघातात गंभीर असलेल्या दोघांचा मृत्यू

0
11

सिंधुदुर्ग:-कणकवली शहरा लगत असणाऱ्या हळवल फाट्यावर आज गुरुवारी पहाटे 5.30 वा च्या सुमारास गोव्याच्या दिशेने जाणारी प्रवासी वाहतूक करणारी लक्झरी पलटी होत यातील दोन प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या गंभीर दुखापत झालेल्या दोघांचा काही वेळापूर्वी मृत्यू झाला आहे. यात शैलेजा प्रेमानंद माजी (60 झरेबांबर दोडामार्ग), अण्णा गोविंद नाले (50 सातारा) या दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील शैलजा माजी या दोडामार्गला जात होत्या. तर अण्णा नाले हे साताऱ्याहून गोव्याला जात होते. पुण्याहून गोव्याच्या दिशेनेही लक्झरी जात असताना हलवलं फाट्यावरील अवघड वळणावर हा अपघात झाला.तर अजून काही प्रवासी गंभीर असून काही प्रवाशाना किरकोळ दुखापत झाली आहे.सुमारे 40 प्रवासी या गाडीतून प्रवास करत असल्याचे समजते. पहाटेच्या सुमारास अपघात झाल्याने एकच हलकल्लोळ झाला. हळवलं फाट्यावरील अवघड वळणावर ही लक्झरी पलटी झाली.

️अपघाताची माहिती मिळतात कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, डॉ. अभिजीत आपटे, पोलीस कर्मचारी किरण मेथे, यांच्यासह अनेकांनी घटनास्थळी घेतली. त्यानंतर डीवायएसपी विनोद कांबळे, पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी रुग्णालयात भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली. नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी देखील उपजिल्हा रुग्णालय व कणकवलीतील काही खाजगी रुग्णालयात भेटी देत अपघातग्रस्त रुग्णांची विचारपूस केली. अपघातातील काहींना कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालयात तर उर्वरित जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काहींचे हात, पाय फ्रँक्चर झाल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. अपघाताची माहिती मिळतात पोलिसांनी गटनेते संजय कामतेकर यांच्याशी संपर्क साधत कलंडलेली लक्झरी उभी करण्याकरिता जेसीबी पाठवण्याची मागणी केली. त्यानुसार ठेकेदार अनिल पवार, जावेद शेख हे जेसीबी घेऊन अपघातस्थळी दाखल झाले होते. परंतु त्याद्वारे या कामाला यश येत नसल्याने अखेर क्रेन द्वारे लक्झरी उभी करण्यात आली. या ठिकाणची वाहतूक सुरळीत करण्याकरता पोलिसांनी अथक प्रयत्न केले.