Home Top News ‘रॉ’ च्या अधिका-याला अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा

‘रॉ’ च्या अधिका-याला अटक केल्याचा पाकिस्तानचा दावा

0
इस्लामाबाद, दि. २५ – भारतीय गुप्तचर संस्था ‘रॉ’ च्या अधिका-याला अटक केल्याचा पाकिस्तानने दावा केला आहे.  याप्रकरणी निषेध नोंदवण्यासाठी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्त गौतम बामबावले यांना समन्स बजावले आहे.
अटक केलेला ‘रॉ’ चा अधिकारी बलुचिस्तान आणि कराचीमध्ये घातपाती कारवायांमध्ये सक्रीय होता असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. अटक केलेल्या अधिका-याचे नाव कुल यादव भूषण असून, तो भारतीय नौदलात अधिकारी आहे असा दावा बलुचिस्तानचे गृहमंत्री मीर सरफराझ बुग्ती यांनी केला आहे.

Exit mobile version