Home Top News आमचे गुरुजी परत द्या : पाल्यांचा टाहो

आमचे गुरुजी परत द्या : पाल्यांचा टाहो

0

विद्यार्थ्यांनी पुकारला बेमुदत संप
सरकारटोला येथील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथील प्रकार

आमगाव,दि.७ : तालुक्यातील सरकारटोला येथील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी एका शिक्षकाच्या नियुक्तीसाठी संप पुकारला आहे. आमगाव तालुक्यातील सरकारटोला येथील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी दि.७ फेब्रुवारी रोजी येथील शिक्षक एस. एन. गोलीवार यांना रुजू करण्यात यावे या मागणीसह आंदोलनास सुरवात केली.
सदर शाळेतील शिक्षक गोलीवार यांच्या वरील आरोप खोटे नाटे असून ते प्रामाणिक पणे विद्यार्थ्यांना शिकवितात, आणि त्यांचा आदर्श विद्यार्थी घडविण्यात सिंहाचा वाटा असल्याचे पालकांनी या वेळी प्रतिनिधीसी बोलताना सांगितले.
येथील शाळेची पटसंख्या एकूण २९६ असून परिसरातील शेतकरी, मजूर वर्गातील विद्यार्थी शिक्षण ग्रहण करतात.
सदर शाळा ग्रामीण क्षेत्राशी निगडित असून ग्रामीण विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचे म्हटले जात आहे.
शिक्षण घेण्याच्या हा आमचा मूलभूत अधिकार आहे, ते हिरावून घेत असल्यामुळे आंदोलनचा पवित्रा घेण्यात आला असल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.
जोपर्यंत रुजू करत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार अन्यथा शाळेतून टीसी काढण्यात येईल, असा इशारा पालकांनी शाळा व्यवस्थापनाला पालकांनी दिला आहे.

Exit mobile version