Home Top News छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ७ जवान शहीद

छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ७ जवान शहीद

0

रायपूर –नक्षलवाद्यांनी केलेल्या भुसुरुंग स्फोटात  केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 7 जवान शहीद झाले आहेत. कुआकोंडा येथे हा हल्ला करण्यात आला. सीआरपीएफ जवानांची तुकडी मालेवारा येथून जात असताना त्यांच्या गाडीवर हा हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मालेवारा येथे पुर्णपणे नक्षलवाद्यांचं वर्चस्व आहे. शहीद झालेले सर्व जवान सीआरपीएफच्या 230 बटालियन तुकडीचे होते अशी माहिती पोलीस अधीक्षक कश्यप यांनी दिली आहे.

– दंतेवाडाच्या पोलिस अधीक्षकांनी सात जवान शहीद झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. सीआरपीएफच्या गाडीत 203 बटालियनचे जवान होते.
– स्फोट एवढा मोठा होता की वाहनाचे इंजिन 100 मीटर दूर अंतरावर जाऊन पडले.
– अशी माहिती आहे, की नक्षलवाद्यांनी स्फोटासाठी 25-30 किलो आयईडीचा वापर केला.

Exit mobile version