Home Top News मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पगाराचा आकडा ऐकून व्हाल...

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पगाराचा आकडा ऐकून व्हाल थक्क

0

आमदारांना दर महिन्याला पगार १ लाख ८० हजार इतका आहे.

मुंबई;-महाराष्ट्रातील विविध गटांच्या आर्थिक स्थितीविषयी बोलताना राज्याचे प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व निवडून दिलेले आमदार यांना किती पगार मिळतो हे तुम्हाला माहितेय का? राज्य सरकारच्या पोर्टल्सवर उपलब्ध माहितीनुसार आज लोकप्रतिनिधींचे पगार किती हे जाणून घेऊया..

एकनाथ शिंदे यांचा महिन्याचा पगार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पगार सुमारे ३ लाखांच्या घरात आहे.यासह मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता अशा विविध सुविधा आणि भत्ते सुद्धा दिले जातात. याशिवाय त्यांना आमदार म्हणून एका महिन्याचे वेतनही दिले जाते.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पगार साधारण ३ लाखापर्यंत असून वर उल्लेख केल्याप्रमाणे मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता आणि सुविधा उपमुख्यमंत्र्यांना दिल्या जातात.

आमदारांचा पगार

याशिवाय सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या आमदारांना एका महिन्याचा मूळ पगार साधारण १ लाख ८० हजार इतका आहे. तर याव्यतिरिक्त महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल यासाठी भत्त्याची तरतूद आहे, असं मिळून हा आकडा २ लाख ३० हजारांच्या घरात जातो. तसेच माजी आमदारांना ५० हजार पेन्शन म्हणून देण्याची सुद्धा तरतूद आहे

Exit mobile version