
नागपूर-महाविकास आघाडीची दुसरी वज्रमुठ सभा नागपुरात सुरू झाली आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जंयत पाटील,माजी मंत्री सुनील केदार आणि आमदार नितीन देशमुख ,माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे गटासह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सभेत अजित पवार भाषण करणार नसल्याने ते नाराज असल्याचा चर्चा सुरू झाल्या आहेत.
LIVE: महाविकास आघाडीची नागपूर येथे वज्रमूठ सभा #महाराष्ट्राची_वज्रमूठ https://t.co/v56322KOi8
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) April 16, 2023
महत्त्वाचे अपडेट
- माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, अदानी हे हेराफरी करणारा माणूस आहे असे अमेरिकेतील कंपनीने आरोप केला आहे. देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अनेक प्रश्नाची उत्तरे मागत आहे. पुलवामा हल्ल्याची माहिती देत असताना राज्यपाल यांना काही बोलू नका असे सांगण्यात आले. 300 टन आरडीएक्स रस्त्यावर फिरताय हे सगळ्या प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिले पाहिजे.
- मी महाराष्ट्राचा गृहमंत्री असताना मला खोट्या गुन्ह्यात फसविण्यात आले. माझ्यावर खोटे दावे करण्यात आले. मी त्याच्या चौकशीची स्वत: मागणी केली होती. माझ्यामागे ईडीची चौकशी लावण्यात आली. यानंतर हायकोर्टात निकाल देण्यात आला त्यात अनिल देशमुख यांच्यावर झालेले आरोप हे ऐकीव माहितीवर करण्यात आले आहे, असे सांगण्यात आले. माझ्यावर काहीच आरोप सिद्ध करण्यासत आले नाही. ज्यांनी आरोप केले ते फरार झाले. 14 महिने कारागृहात राहून आलो आहे. आता मला कुणीही थांबवू शकत नाही. नागपूरमधील सभेला विरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला , असा आरोप अनिल देशमुख यांनी केला आहे.
- अनिल देशमुख म्हणाले की, राज्यात येणारे उद्योग धंदे दुसऱ्या राज्यात जात आहे. नागपुरात मिहानचा प्रकल्प आहे. नागपूर मध्ये येणारा प्रकल्पदेखील इथे येऊ शकला नाही. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमांतून कासय काम सुरू आहे असा सवाल त्यांनी उपसथित केला आहे.
- उद्धव ठाकरेंना मातोश्री बाहेर येऊ देणार नाही असे चंद्रशेखर बावनकुळे म्हटले होते. मात्र आज उद्धव ठाकरे हे नागपुरात आले आहे, असा टोला उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना लगावला आहे. तर हे मंतिमंद प्रदेशाध्यक्ष असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोमुळे शिवसेनेचे मतदान कमी झाले, असा टोला आमदार नितीन देशमुख यांनी लगावला आहे. विदर्भाचे मुख्यमंत्री असताना देखील 2014 पासून विदर्भाचा काहीच विकास झाला नाही, असा टोला आमदार नितीन देशमुख यांनी भाजपला लगावला आहे.
- हे सरकार ईडीच्या भरोश्यावर आले आहे असा टोला आमदार नितीन देशमुख यांनी हल्लाबोल केला आहे. त वज्रमूठ सभेत बोलताना शिंदे गटावर हल्लाबोल केला. हे सरकार कसे आले मला माहीत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, देशात ज्या घटना घडत आहे, त्यामुळे असे वाटते आहे की, देशात लोकशाही राहिल का नाही असे वाटू लागले आहे. वज्रमूठ तुमच्यासाठी बांधलेली आहे. ती अशीच राहिल असेही त्यांनी म्हटले आहेे.

एकीकडे अजित पवारांच्या भाषण न करण्याची चर्चा रंगलेली असतानाच दुसरीकडे काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण हेदेखील वज्रमूठ सभेला उपस्थित राहणार नाहीत. स्वत: अशोक चव्हाण यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.
मैदानावर भव्य एलईडी स्क्रीन
नागपुरातील नंदनवन येथील दर्शन कॉलनी मैदान येथे सायंकाळी 5 वाजता महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. या सभेला रेकॉर्डब्रेक गर्दी जमवण्यासाठी तिन्ही पक्षातील नेते, कार्यकर्ते गेल्या काही दिवसांपासून प्रयत्न करत आहेत. काँग्रेस नेते माजी मंत्री सुनील केदार हे या सभेचे संयोजक आहेत. या सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून 50 हजारांवर आसनव्यवस्था करण्यात आली आहे. मैदानावर भव्य एलईडी स्क्रीनही उभारण्यात आले आहेत.

संविधान वाचवण्यासाठी लढा
तत्पूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. अंबादास दानवे म्हणाले, देशात भाजपची दडपशाही सुरू आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांची मुस्कटदाबी केली जात आहे. हुकूमशाही पद्धतीने कारभार सुरू आहे. त्याविरोधात महाविकास आघाडीने वज्रमूठ आवळली असून लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी हा लढा आहे. ही सभा होऊ नये म्हणून भाजपकडून अडथळे आणले गेले, मात्र ते व्यर्थ ठरले.
पवारांनी खुलासा करावा
‘शिवसेनेचे 40 आमदार फोडून भाजपने महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली. त्यातले 16 जण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने अपात्र ठरतील म्हणून सत्ता वाचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे तेवढेच आमदार ईडी, सीबीआयच्या मदतीने फोडायचे असे कारस्थान चालले आहे. ते 16 कोण?’, असा सवाल ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये रोखठोक या सदरात संजय राऊत यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच चर्चा सुरू आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार भविष्यात काय करतील? 15 आमदारांसह ते भाजपात सामील होतील असे शिंदे व भाजपचे आमदार छातीठोकपणे सांगत होते. या सगळ्यांवर परखड खुलासा अजित पवार यांनीच करायला हवा.
गुलाबराव पाटलांचे वक्तव्य काय?
मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले, अजित पवारांसोबत बरेच आमदार आहे. मात्र, कोणत्याही लग्नासाठी तिथी आवश्यक आहे. सध्या अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. अजून कुळ बघावे लागेल. गुण जुळवावे लागतील व नंतरच ते काम करावे लागेल. आकडा ते सांगतील तो असेल तोच असेल, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. नागपूरमध्येही महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून ही सभा वज्रमूठ आहे की फुटलेली मुठ आहे हे उद्या दिसेल अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केली आहे.