Home Top News छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवादी ठार

छत्तीसगडमध्ये दोन नक्षलवादी ठार

0

रायपूर – सुखमा जिल्ह्यात छत्तीसगड पोलिसांच्या कारवाईत दोन नक्षलवादी ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली. या गोळीबारात आणखी काही जण जखमी झाले आहेत. सुखमा जिल्ह्यातील कुमाकोलिन गावानजिक दुर्गम भागात तपास मोहीम सुरू असताना लपलेल्या नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही गोळीबार केला. तेव्हा त्यात दोन नक्षलवादी मारले गेले आणि आणखी काही जण जखमी झाले. घटनास्थळाहून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला आहे.

Exit mobile version