Home Top News NEET – सोमवारी फेरविचार याचिका दाखल करणार

NEET – सोमवारी फेरविचार याचिका दाखल करणार

0
मुंबई, दि. 29 – महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी आपल्या निर्णयाचा पुन्हा विचार करावा अशी याचिका सोमवारी पुन्हा सुप्रीम कोर्टात दाखल करणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे.
विद्यार्थ्यांनी 5 मेच्या राज्याच्या सीईटीसाठीच तयारी सुरू ठेवावी आणि ती द्यावी असा सल्लाही तावडे यांनी दिला आहे.
दरम्यान, ज्या विद्यार्थ्यांनी 1 मेच्या नीटसाठी अर्ज केला नसेल त्यांच्यासाठी 24 जुलै रोजी दुसऱ्या टप्प्यातल्या नीटच्या परीक्षेचा मार्ग मोकळा आहे. त्यामुळे नीट हीच परीक्षा आवश्यक असल्यास त्यांना 24 जुलैच्या प्रवेश परीक्षेच्या माध्यमातून मेडिकलसाठी प्रवेश मिळण्याची संधी उपलब्ध राहणार आहे.

Exit mobile version