शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांचा सभात्याग; शरद पवार गटाचे आमदार अनुपस्थित, चर्चांना उधाण

0
29

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सरकारला पाठिंबा देत मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर पहिलेच अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांनी कामाला सुरूवात केली असून या अधिवेशनात त्यांच्यावर विरोधक हल्ला करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, राष्ट्रवादीमध्ये पडलेल्या उभ्या फूटीनंतर महाविकास आघाडीची बाजू कमकुवत झाली आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांचा वचरष्मा राहील अशी शक्यता वर्तवली जात आहे.  मात्र, शरद पवार गटाचे आमदार या आंदोलनात सहभागी नव्हते. त्यामुळे शरद पवारांची भूमिका काय?, यावरून पुन्हा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.

लाईव्ह अपडेट्स

दुबार पेरणीची वेळ आल्यास सरकार शेतकऱ्यांच पाठीशी असल्याचे

  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव अध्यक्षांनी फेटाळल्यानंतर विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्या नंतर विरोधी पक्षाने सभात्याग केला.
  • शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचा स्थगन प्रस्ताव मांडला. राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हा प्रस्ताव फेटाळला.
  • ‘वंदे मातरम्’ ने सभागृहाच्या कामकाजाला सुरूवात झाली. सुरूवातीलाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह नव्या मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला.
  • विरोधकांच्या वतीने विधानभवनाच्या पायऱ्यांवर करण्यात आलेल्या घोषणाबाजीवेळी शरद पवार समर्थक एकही आमदाराची उपस्थिती नाही.
  • विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या आमदारांची जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. ‘घटनाबाह्य कलंकीत सरकारचा धिक्कार’ अशा प्रकारचे फलक आमदारांनी दाखवले आहेत.
  • विरोध पक्ष नेते पदाच्या निवडीसाठी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक सुरू झाली आहे. विरोधी पक्ष नेता हा काँग्रेसचाच असेल, असे बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केले.
  • अदानीला धारावी मिळते, शेतकऱ्यांना काय मिळाले? आमदार यशोमती ठाकूर यांचा सरकारला सवाल
  • अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या मंत्री आमदारांची विधानभवनात बैठक सुरू झाली आहे.
  • अजित पवार यांनी सकाळीच अर्थमंत्रालयातील अधिकाऱ्यांची बैठक घेत आढावा घेतला
  • अर्थमंत्री अजित पवार सकाळी ठिक आठ वाजता विधान भवनाकडे रवाना झाले आहेत.
  • राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांसाठी शरद पवार गटाकडून व्हीप जारी
पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व मंत्र्यांना त्यांच्या दालनाचे वाटप करण्यात आले.
पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व मंत्र्यांना त्यांच्या दालनाचे वाटप करण्यात आले.

नार्वेकरांच्या निर्णयाकडे लक्ष

विधानसभेतील पक्षनिहाय आमदारांची आसनव्यवस्था कशी राहील, याचा निर्णय विधानसभा सभागृह सुरू झाल्यानंतर होईल. परिणामी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांची आमदार संख्या यातून स्पष्ट होईल. शिवाय अधिवेशनाचा पहिला दिवस विधानसभेतील विरोधी पक्षनेत्याचे पद रिक्त असल्यामुळे त्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर काय देतात, याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.

अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विधानसभेत एकत्र प्रवेश केला.
अर्थमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी विधानसभेत एकत्र प्रवेश केला.
अजित पवार यांनी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
अजित पवार यांनी विधान भवन परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन केले.