शरद पवार गटाला निवडणूक आयोगाची नोटीस; अजितदादांच्या याचिकेची घेतली दखल

0
25

*नवी दिल्ली :-राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर खरी राष्ट्रवादी कोणाची हा पेच निर्माण झाला आहे. यासाठी शरद पवार आणि अजितदादा या दोघांच्या गटानं आपलाच गट खरा राष्ट्रवादी पक्ष असल्याचा दावा केला आहे.यावर शिक्कामोर्तब व्हावं यासाठी दोन्ही गटांनी निवडणूक आयोगात धाव घेत याचिका दाखल केली होती. यावर आयोगानं अजितदादांच्या याचिकेची दखल घेत शरद पवार गटाला नोटीस पाठवली आहे. एबीपी माझानं याबाबत वृत्त दिलं आहे.

*️️अजितदादांची याचिका काय होती?

आपल्याकडं सर्वाधिक आमदार, पक्षाचे सदस्य आणि जिल्हा स्तरावरील पदाधिकारी आहेत. त्यामुळं विधीमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष आम्हीच आहोत, असा दावा अजितदादा गटानं निवडणूक आयोगाकडं केलेल्या याचिकेत केला आहे.

*शरद पवारांची याचिका काय?

*तर शरद पवारांनी देखील पक्ष फुटीनंतर तातडीनं मंत्रिमंडळात शपथ घेणाऱ्या नऊ आणि दोन खासदारांविरोधात अपात्रतेची नोटीस पाठवली होती. तसेच नंतर टप्प्याटप्प्यानं अजितदादांना समर्थन देणाऱ्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलं होतं. त्याचबरोबर निवडणूक आयोगात धाव घेत सुप्रीम कोर्टाच्या शिवसेने संदर्भातील निकालानुसार आम्हीच मूळ राजकीय पक्ष आहेत, असा दाव केला आहे.*

*️️पवारांना उत्तरासाठी दिला इतका वेळ*

*दरम्यान, अजितदादांच्या याचिकेची दखल घेत निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या गटाला नोटीस पाठवली आहे. तसेच त्यांना म्हणणं मांडण्यासाठी वेळही देण्यात आला आहे. त्यामुळं आयोगानं दिलेल्या वेळेत शरद पवार गटाला आपली बाजू मांडावी लागणार आहे. त्यानंतर अजितदादांच्या गटाला देखील निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवली जाऊ शकते.*