Home Top News वाघाच्या कातडीची तस्करी करणा-या चौघांना अटक

वाघाच्या कातडीची तस्करी करणा-या चौघांना अटक

0

चंद्रपूर- १० वर्षांपूर्वी शिकार करण्यात आलेल्या वाघिणीच्या कातडीसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. शेजारच्या तेलंगाना राज्यातून वाघाचे कातडे घेऊन गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधी मार्गे काही दुचाकीस्वार मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास येत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यावरून चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्यांनी भंगाराम तळोधी परीसरात सापळा रचून वाघिणीच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली. हे चारही आरोपी तेंलगाना राज्यातील रहीवासी असल्याची माहिती आहे. या वाघिणीच्या कातड्याची किंमत ५० लाख असल्याचे सांगितल्या जात आहे.

Exit mobile version