आंबोलीत पर्यटकांची कार ३० फुट दरीत कोसळली…

0
5

झाडाला गाडी अडकल्यामुळे आतील ५ प्रवासी सुदैवाने बचावले.

आंबोली :- येथील घाटात खोल दरीत मध्यप्रदेश येथील पर्यटकांची आलिशान कार तब्बल ३० फूट खोल कोसळली. मात्र झाडाला गाडी अडकल्यामुळे आतील ५ प्रवासी सुदैवाने बचावले. ही घटना काल रात्री तीन वाजता घडली. याबाबतची माहिती १०० नंबरवर फोन करून दिल्यानंतर त्या ठिकाणी जाऊन आंबोली पोलिसांनी मदत कार्यात सहभाग घेतला.

यावेळी पोलीस हवालदार दत्ता देसाई,कॉन्स्टेबल राजेश नाईक यांनी घाटात खाली अडकलेल्या प्रवाशांना वर काढले. रात्रीच्या काळोखात प्रवासी अडकल्यामुळे त्यांना मदत करण्यास काहीसे अडथळे आले. परंतु अडथळे पार करत पोलिसांनी त्यांना सहकार्य केले. त्यामुळे अपघात झालेल्या गाडीतील पाचही पर्यटकांनी आंबोली पोलिसांचे आभार मानले.

दरम्यान आज सायंकाळी अभी कांबळे ,राजेश नाईक दीपक शिंदे व मनीष शिंदे आदींनी त्या ठिकाणी घाटात पडलेली गाडी बाहेर काढली. परंतु या प्रकरणी आंबोली पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही असे सांगण्यात आले.