नितीन गडकरी यांचा काटा काढण्यासाठी ‘कॅग’चा वापर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0
13

मुंबई-कॅगच्या अहवालात नरेंद्र मोदी सरकारच्या 7 योजनांतील भ्रष्टाचारावर बोट ठेवण्यात आले आहे. यामुळे विरोधकांनी सरकारवर चौफेर टीका सुरू केली आहे. त्यातच आता काँग्रेस नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी कॅगच्या अहवालाद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा राजकीय काटा काढण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. ते शुक्रवारी मुंबईत बोलत होते.

काय म्हणाले विजय वडेट्टीवार?

कॅगचा रिपोर्ट अत्यंत महत्त्वाचा आहे. भाजपाच्या अंतर्गत राजकारणाचा भाग म्हणून नितीन गडकरींचा काटा काढण्यासाठी या रिपोर्टचा वापर होत आहे. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार सुरू असताना कॅगने केवळ गडकरींवर ताशेरे ओढले. यातून गडकरींचा काटा काढण्यात येत असल्याचे स्पष्ट होते.

गडकरींना संपवण्याचा डाव

काहींना नितीन गडकरींचा काटा काढायचा आहे. हे अंतर्गत राजकारण आहे. कॅगचा अहवाल कदाचित त्यामागची पार्श्वभूमी असू शकते. प्रत्येक विभागात प्रचंड भ्रष्टाचार असताना कॅगने फक्त गडकरींच्या खात्यावर ताशेरे ओढले आहेत. त्यावरून सर्व काही स्पष्ट होते. गडकरींची प्रतिमा स्वच्छ आहे. विकासाची आहे. त्यातून त्यांना साईड ट्रॅक करायचं. त्यांचे राजकारण संपवायचं हा डाव असू शकतो, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.

पीएम मोदींची भूमिका काय?

केंद्राच्या विविध योजनांत भ्रष्टाचार झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. घोटाळा झालेल्या विभागातील रस्त्यांच्या त्या समितीचे अध्यक्ष स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे कॅग अहवालावर त्यांची भूमिका काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. केंद्रात सर्वत्र मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. हा अहवाल समोर आल्यानंतर आता केंद्र सरकार कोणती कारवाई करते याकडे आमचे लक्ष्य लागले आहे