Home Top News नक्षलवाद्यांनीच केली हत्या

नक्षलवाद्यांनीच केली हत्या

0

गडचिरोली-नक्षल सर्मथक राहिलेले काशिराम मडावी (वय ४०) यांचा शुक्रवारी नक्षलवाद्यांनी खून केल्याची घटना घडली. २४ मे रोजी नक्षलवाद्यांनी काशिराम मडावी यांचे अपहरण केले होते. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली व शुक्रवारी पहाटे हत्या करून त्यांचा मृतदेह कटेझरी परिसरात आणून टाकला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
काशिराम मडावी हे प्रदीर्घ काळापासून नक्षल संघटनेशी जुळून होते व नक्षल संघटनेच्या गाव व एरिया पातळीवरील कामे स्थानिक दलमच्या संपर्कात राहून करीत होते. त्यांचे अलिकडच्या काळात नक्षलवाद्यांशी खटकले. त्यामुळे ते नक्षलवाद्यांच्या टार्गेटवर आले. यातूनच ही हत्या झाली असावी, अशी शक्यता गडचिरोली पोलीस सूत्रांनी वर्तविली आहे. नक्षलवाद्यांच्या चळवळीत प्रचंड प्रमाणात वाद निर्माण झाले असून त्यातूनच अशा हत्या केल्या जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

Exit mobile version