Home Top News चकमकीत 4 दहशतवादी ठार

चकमकीत 4 दहशतवादी ठार

0

वृत्तसंस्था
श्रीनगर – कुपवाडा जिल्ह्यातील तंगधार सेक्टरमध्ये भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये आज (गुरुवार) पहाटे झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले आहेत. या चकमकीत एक भारतीय जवान जखमी झाला आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तंगधार सेक्टरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलओसी) भारतीय जवान आणि दहशतवाद्यांमध्ये बुधवारी रात्रीपासून चकमक सुरु आहे. भारतीय जवानांना चार दहशतवाद्यांना ठार करण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Exit mobile version