राजधानीत यशवंतराव चव्हाण यांना जयंतीनिमित्त अभिवादन

0
13

नवी दिल्ली, दि. १२: संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज अभिवादन करण्यात आले.

कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात निवासी आयुक्त रूपिंदरसिंग यांनी यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिमेस तसेच, कस्तुरबा गांधी मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त डॉ. प्रतिमा गेडाम व स्मिता शेलार यांच्यासह महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आज यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस महाराष्ट्र परिचय केंद्राच्या उपसंचालक अमरज्योत कौर अरोरा यांनी पुष्प अर्पण करून आदरांजली वाहीली. उपस्थित कर्मचाऱ्यांनीही पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

मुंबई, दि. १२ : आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, राज्याचे पहिले मुख्यमंत्री व भारताचे माजी उप प्रधानमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आज विधान भवनातील त्यांच्या पुतळ्यास महाराष्ट्र विधानमंडळाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे व सचिव (२) (कार्यभार) डॉ.विलास आठवले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळाचे उप सचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि जनसंपर्क अधिकारी, म.वि.स. निलेश मदाने, विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदिप चव्हाण यांच्यासह विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.