Home Top News मराठवाड्यासह पश्चिम विदर्भात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मराठवाड्यासह पश्चिम विदर्भात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

0

हिंगोली,दि.21 मार्चः  गुरूवारची सकाळ मराठवाड्यातील नागरिकांसाठी अतिशय खळबळजनक ठरली.मराठवाड्यातील हिंगोलीसह पश्चिम विदर्भातील वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरूवारी सकाळी-सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोलीमध्ये गुरूवारी सकाळी एकामागोमाग एक असे दोन भूकंपाचे धक्के बसले. १० मिनिटांच्या अंतराने झालेल्या या भूकंपामुळे नागरीक घाबरले. भूकंपाचा पहिला झटका 6 वाजून 8 मिनिटांनी जाणवला. 4.5 रिश्टर स्केल एवढी त्याची तीव्रता होती. तर भूकंपाचा दुसरा झटका दहा मिनिटांनी 6 वाजून 19 मिनिटांच्या आसपास बसला. त्याची तीव्रता 3.6 रिश्टर स्केल इतकी होती. हिंगोली व्यतिरिक्त नांदेड, परभणी,वाशिम येथेही काही ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

Exit mobile version