Home Top News दोनवर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

दोनवर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य

0

गोंदिया,दि.08-जिल्ह्यातील तिरोडा येथील एका प्रतिष्ठित व नावाजलेल्या व्यवसायकित व्यक्तीकडून दोनवर्षिय मुलाचे अनैसर्गिक लैंगिक शोषणाचा प्रकार उघडकीस आला असून सदर मुलाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास गोंदियाच्या बाई गंगाबाई महिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.सदर मुलाचे नाव अंश उमाशंकर तिवारी रा.तिरोडा(खैरलांजी रोड) असे आहे.मुलासोबत घराशेजारीलच अजय धामेचा नामक व्यक्तीने लैंगिक शोषण केल्याचा आरोप मुलाचे वडील उमाशंकर तिवारी यांनी केला आहे.त्या मुलाच्या प्रकृतीकडे बघितल्यास त्याच्यावर जबरदस्तीने अनैसर्गिक कृत्य करण्यात आल्याचे चिन्ह स्पष्ट दिसून येत असून मुलगा अजूनही धास्तावलेला आहे.मुलाच्या वडीलाने दिलेल्या माहितीनुसार गुरुवारला सदर आरोपीसोबत वाहनाने बिरसी येथे फिरण्यासाठी गेलो असता बिरसीला मी काही कामानिमित्त गाडीतून खाली उतरलो.तेव्हा धामेचा यांने मुलाला समोरुन चक्कर मारुन आणतो असे सांगितले.जेव्हा 20-25 मिनिटांनी परत आले असता मुलाच्या तोंडातून रक्त निघत असल्याचे लक्षात आले असता विचारणा केल्यावर काही नाही ब्रेक मारतांना मुलाला लागल्याने रक्त निघत असल्याचे सांगितले.परंतु जेव्हा घरी आलो असता मुलांला परत विचारल्यावर त्याने वाईट काम केल्याचे सांगितले.विशेष म्हणजे सदर व्यक्तीचे व मुलाच्या वडिलाचे मैत्रिचे संबध असून घरी येणे होते.या आधी सुध्दा एकदा मुलाला मारहाण झाल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रकरणाला दाबण्यासाठी राजकीय दबावतंत्रातचा वापर करण्यात येत असल्याची चर्चा असून गोंदियाच्या बाई गंगाबाई रुग्णालयात समाजसेवी व आप चे सक्रिय सदस्य डाॅ.नितेश बाजपेयी,उमेश दमाहे यांच्यासह इतरांनी मुलाच्या स्थितीकडे बघून संबधित आरोपीवर गुन्हा दाखल होऊन अटकेची मागणी केली आहे.दरम्यान तिरोड्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि तिरोडाचे ठाणेदार यांनी बाई गंगाबाई रुग्णालय गाठून मुलाच्या आईवडीलाचे बयाण नोंदविण्यास सुरवात केली असून वृत्त लिहिपर्यंत पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली नव्हती.मुलाच्या आईवडींलांनी अजय धामेचा नामक व्यक्तीमुळेच आपल्या मुलाचे लैंगिकशोषण होऊन प्रकृती खालावल्याचे म्हटले आहे.

Exit mobile version