Home Top News मोहला दलमची महिला नक्षली ठार

मोहला दलमची महिला नक्षली ठार

0

गडचिरोली,दि.10 -पेंढरी पोलीस ठाण्याला लागून छत्तीसगडच्या राजनांदगाव जिल्ह्याची सीमा सुरु होते. या भागात मानपुर ते कोहकाच्या दरम्यान माओवाद्याच्या लोकेशनची माहीती मिळाल्यानंतर छत्तीसगडच्या पोलिसांसह इंडो तिबेट बटालियनच्या जवानांनी राबविलेल्या संयुक्त अभियाना दरम्यान मंगळवारी झालेल्या चकमकीत पोलिसांनी एका माओवादी महिलेला ठार केले. ती महिला माओवादी मोहला दलमची सक्रीय सदस्य रामशीला असून, तिच्यावर एक लाखाचे बक्षीस होते. पोलिसांनी तिच्या मृतदेहासह घटनास्थळावरुन बारा बोअरची एक बंदूक आणि काही काडतुसे जप्त केली आहेत.

Exit mobile version