लॉरेन्स बिश्नोई टोळीचा गँगस्टर गजाआड

0
47

यवतमाळ : बिश्नोई व गुज्जर गँग ही भारतातील महत्वाची व गुन्हेगारी जगतात नावाजलेली गँग म्हणून ओळखल्या जाते. कॉन्ट्रॅक्ट किलींग व खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे घडविण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या शार्प शूटरला अटक करण्यात यवतमाळच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या अटकेमुळे बिश्नोई व गुज्जर गँगला मोठा झटका बसला आहे.

बिश्नोई व गुज्जर गँगच्या माध्यमातून विदर्भातही गँग आपले पाळेमुळे रूजवण्याच्या प्रयत्नांत होती. मात्र यवतमाळ जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर यांनी लॉरेन्स बिश्नोई गँगच्या कॉन्ट्रॅक्ट किलर भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा यांच्या मुसक्या आवळल्यामुळे ही टोळीच्या विदर्भात सक्रिय होण्याच्या आधीच ब्रेक लागला आहे.

अटक झालेला आरोपी भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा हा शार्पशूटर गेल्या दोन वर्षांपासून ओळख लपवून यवतमाळ शहरात राहत होता. तो जालंधर पंजाबचा रहिवासी आहे. भिंडा गेल्या दोन वर्षांपासून बदललेल्या ओळखीने यवतमाळमध्ये वडगाव येथील दांडेकर ले आऊट मध्ये राहत होता. आरोपीवर पंजाब आणि राजस्थानमध्ये हत्येसह १६ गुन्हेगारी गुन्हे दाखल आहेत अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी पत्रकार परिषदेत दिली.

भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा याने एका ठिकाणी दारूच्या नशेत आपण कोणी साधेसुधे व्यक्ती नसून मोठे गँगस्टर आहोत हीच माहिती देणे भुपेंद्र सिंगच्या अंगलट आली. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांच्या मार्गदर्शनाखाली यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक संतोष मनवर व यांच्या पथकाने वडगाव येथील जांब रोड जवळ असलेल्या दांडेकर ले-आऊट येथे जाऊन मिळालेल्या माहितीनुसार आरोपी भाड्याने राहात असलेल्या घराच्या बाहेर घेराव घातला.

आरोपी भुपेंद्र सिंग याला पोलिसांनी आपल्याला घेरले असल्याची कुणकुण लागल्याने त्याने पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्याची पोलिसांशी झटापट झाली. अखेर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भुपेंद्र सिंगला पकडले. ही (Lawrence Bishnoi Gang) कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता जिल्हा पोलिस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक पियूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक, संतोष मनवर, सफौ योगेश गटलेवार, पो.ह.वा. विनोद राठोड, निलेश राठोड, पो.शि आकाश सहारे, म.पो.ना ममता देवतळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी केली आहे.

भुपेंद्र सिंगने २०२३ मध्ये राजस्थानातील बाडनेर येथे हरिपालसिंग ऊर्फ रिंकू (रा. गंगानगर) याचा खून केला होता. त्या गुन्ह्यात तो पसार असल्याने राजस्थान पोलिसांनी भूपेंद्रसिंग याच्यावर २५ हजारांचे रोख बक्षीस ठेवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अटक होऊ नये म्हणून भूपेंद्रसिंग सातत्याने राहण्याची ठिकाणे बदलत होता. तो बनावट नावाने घर भाड्याने घेत होता. यवतमाळच्या जांब रोड वरील परिसरात तो ओळख लपवून रूम भाड्याने करून राहत होता.

भुपेंद्र सिंग उर्फ भिंडा ला अमेरिकेतून फंडिग

रघुविर उर्फ रघु उर्फ भुपेंद्र सिंग उर्फ भिंडा याला अमेरीकेतून सौरव गुज्जर (गैंगस्टर बिल्लू गुज्जर याचा भाउ तसेच गोल्डी ब्रार याचा मित्र) हा डॉलर मध्ये मनी ट्रान्सफर च्या मदतीने मागील तिन वर्षांपासून पैसे पाठवित होते असायचा जेणेकरून हे गुन्हेगार भविष्यामध्ये कोणताही गुन्हा करण्यासाठी तयार राहतील असे निष्पन्न झाले आहे.आरोपीला विदेशातून तीन वर्षांपासून आर्थिक मदत मिळत होती. गँग स्टार बिल्लू गुजर याचा भाऊ सौरभ गुज्जर हा सध्या परदेशात आहे. त्याच्या मार्फत भुपेंद्र सिंगला डॉलर्समध्ये पैसे ट्रान्सफर केले जात होते. या पैशांच्या मदतीने तो आपली उपजीविका करून सक्रिय होता.

भिंडाच्या घरून पिस्टल जप्त

आरोपी भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा हा शार्पशूटर गेल्या दोन वर्षांपासून ओळख लपवून यवतमाळ शहरात राहत होता.  स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला अटक केल्यानंतर चौकशी दरम्यान भुपेंद्र सिंग उर्फ भिंडाच्या घरून पिस्टल जप्त करण्यात आली.