Home Top News बिहारमध्ये विषारी दारुचे 13 बळी

बिहारमध्ये विषारी दारुचे 13 बळी

0

वृत्तसंस्था
पाटणा(बेरारटाईम्स) – बिहारमधील गोपलगंज येथे पोटदुखी आणि उलटीचा त्रास होत असलेल्या 13 जणांचा मृत्यू झाला आहे. कुटुबीयांचे म्हणणे आहे, की हे लोक दारु प्यायले होते. त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. मंगळवारी रात्री 7 जणांचा मृत्यू झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत हा आकडा 13 वर गेला आहे. दुसरीकडे, प्रशासनाने दारु प्याल्यामुळे हे मृत्यू झाल्याचे अद्याप मान्य केलेले नाही. या मृत्यूची चौकशी करण्यासाठी तीन सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी गेल्या वर्षी एप्रिल राज्यात दारुबंदी लागू केली आहे.
ही घटना गोपालगंज जवळील खजूरवाडी गावातील आहे. मृतांपैकी एक शशिकांत यांचा भाऊ महेशने सांगितले, की १५ ऑगस्ट रोजी त्याच्या भावासह गावातील काही लोक दारु पिण्यासाठी खजूरवाडी येथे गेले होते. ते हरखुआ साखर कारखान्याजवळील अवैध दारु अड्ड्यावर दारु प्यायले. त्यानंतर काही तासांनी त्यांची प्रकृती बिघडली. गोपालगंजचे जिल्हाधिकारी राहुल कुमार म्हणाले, ‘मृत व्यक्तींचे पोस्टमॉर्टम केले जाईल. त्याचा अहवाल आल्यानंतरच या लोकांचा मृत्यू कशामुळे झाला हे स्पष्ट होईल.’

Exit mobile version