Home Top News बलुचिस्तानात दर्ग्याबाहेर बॉम्बस्फोट, ३० ठार, १०० जखमी

बलुचिस्तानात दर्ग्याबाहेर बॉम्बस्फोट, ३० ठार, १०० जखमी

0
वृत्तसंस्था
बलूचिस्तान, दि. १२ – पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतातील प्रसिद्ध शाह नूरानी दर्ग्याबाहेर शनिवारी शक्तीशाली बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात ३० जण ठार झाले असून १०० हून अधिक नागरीक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
बलुचिस्तानातील लासबेला जिल्ह्यामध्ये हा दर्गा आहे. धमाल या सुफी नृत्याच्या कार्यक्रमासाठी भाविक मोठया संख्येने जमले असताना हा स्फोट झाला. दुर्गम भागात हा दर्गा असून कुठल्याही दहशतवादी गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
कराचीपासून २५० किमी अंतरावर हा दर्गा आहे. कराची आणि देशाच्या अन्य भागातून हजारो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात तरीही कुठलीही वैद्यकीय सुविधा इथे उपलब्ध नाही असे स्थानिक तहसीलदार जावेद इकबाल यांनी सांगितले.

Exit mobile version