Home Top News लोकसभेच्या दालनात उडी मारण्याचा प्रयत्न करणारा ताब्यात

लोकसभेच्या दालनात उडी मारण्याचा प्रयत्न करणारा ताब्यात

0
नवी दिल्ली, दि. 25 – लोकसभेतील दालनामध्ये प्रेक्षकांच्या रांगेत बसलेल्या एका व्यक्तीने उडी मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली. यानंतर या व्यक्तीला सुरक्षा कर्मचा-यांनी पकडून ताब्यात घेतले. विरोधकांच्या गोंधळामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सभागृहाचे कामकाज दुपारी 12 वाजेपर्यंत स्थगित केल्याची घोषणा केली, त्याचवेळी प्रेक्षकांमध्ये बसलेल्या या व्यक्तीने सभागृहाच्या दालनात उडी मारण्याचा प्रयत्न केला.
यावेळी, सुरक्षा कर्मचा-यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने काहीतरी बोलायचे असल्याचे सांगितले. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीकोनातून खबरदारी म्हणून सुरक्षा कर्मचा-यांनी त्याला ताब्यात घेतले. दरम्यान, लोकसभेच्या दालनात उडी मारण्याचा प्रयत्न करणारा हा व्यक्ती बुलंदशहरचे खासदार भोला सिंह यांच्या ओळखीने आल्याची माहिती समोर येत आहे.

Exit mobile version