Home Top News गोंदियात बिंदल प्लाझा हॉटेलला भीषण आग, एकाचा मृत्यू

गोंदियात बिंदल प्लाझा हॉटेलला भीषण आग, एकाचा मृत्यू

0

गोंदिया, दि. 21 – शहरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या बिंदल प्लाझा हॉटेलला भीषण आग लागली आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. या आगीत हॉटेलचे 4 मजले जळून खाक झाले आहेत. तब्ब्ल चार तासानंतर हॉटेलबाहेरील आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं असलं तरी आतमध्ये मात्र आग अजून धुसमत आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाला असून 10 ते 15 जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या प्लाझा मध्ये गेल्या अनेक वर्षापासून झी महासेल नावाची दुकान सुरु होती त्या दुकानालाच आधी आग लागल्याचे बोलले जात आहे.विशेष म्हणजे महासेल फक्तकाही दिवसापुरता असते परंतु हा महासेल गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने सुरु असताना कामगार आयुक्त कार्यालय व नगपरिषेदचे दुर्लक्ष झाले होते.ज्या हाेटलला आग लागली त्या होटलचे सुध्दा वरचे काही बांधकाम अनधिकृत परवानाचे असल्याचे बोलले जात असून भाजपच्या एका जेष्ठ नेत्याचे ज्यांचे संबध सघांशी आहेत त्यांचे हे होटल आहे.

आगाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गोंदिया,तिरोडा व बालाघाट येथून 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आग लागण्याचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचं प्राथमिक वृत्त आहे.

Exit mobile version