Home Top News नक्षली बॅनर व पत्रके आढळली

नक्षली बॅनर व पत्रके आढळली

0

गडचिरोली,दि.20 – : भामरागड-आलापल्ली मुख्य मार्गावर भामरागडपासून दोन किमी अंतरावर अनेक ठिकाणी नक्षली बॅनर व पत्रके आढळली. २९ मार्च २०१७ च्या भारत बंदला यशस्वी करा, असे आवाहन नक्षलवाद्यांनी बॅनर व पत्रकातून केले आहे. यामुळे परिसरात नक्षली दहशत निर्माण झाली आहे.
प्रा. साईबाबा, हेम मिश्र व अन्य पाच लोकांना आजीवन कारावासाची शिक्षा दिली आहे. या शिक्षेचा विरोध करा, असा उल्लेखही बॅनर व पत्रकात करण्यात आला आहे. शहीद-ए-आजम भगतसिंग, राजगुरू, सुखदेव की शहादत के मौके पर २३ से २९ मार्च २०१७ तक साम्राज्यवादी विरोध सप्ताह मनाए. २९ मार्च को भारत बंद सफल बनाए, असे आवाहन नक्षलवाद्यांनी केले असून इन्कलाब जिंदाबाद, साम्राज्यवाद मुर्दाबाद, भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असाही बॅनर व पत्रकात उल्लेख आहे.

Exit mobile version