Home Top News श्रीहरी अणेंच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

श्रीहरी अणेंच्या गाडीवर शिवसैनिकांचा हल्ला

0

औरंगाबाद, दि.23-राज्याचे महाधिवक्ता आणि विदर्भवादी नेते श्रीहरी अणेंची शिवसैनिकांनी गाडी फोडली गेली . औरंगाबादमध्ये वेगळा मराठवाडा विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी अणे आले होते. यावेळी शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला.मात्र अणेंच्या ड्रायव्हरने गाडी थांबवली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. शिवसैनिकांनी केलेल्या दगडफेकीत अणेंच्या कारच्या मागच्या काचा फुटल्यात. या प्रकरणी अजून कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नाही.

Exit mobile version