Home Top News जवानांनी चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

जवानांनी चार दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

0

श्रीनगर, दि. 10 – भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न करणा-या चार पाकिस्तानी घुसखोरांचा भारतीय लष्कराने सोमवारी खात्मा केला. जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील केरान भागात ही चकमक झाली. सध्या या भागात लष्कराकडून शोधमोहिम सुरु आहे.केरान सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा ओलांडून दहशतवाद्यांचा गट भारतीय हद्दीत घुसखोरीचा प्रयत्न करत होता पण सर्तक असलेल्या जवानांनी त्यांचा प्रयत्न उधळून लावला अशी माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली.

Exit mobile version