Home Top News घरावर झाड पडून चिमुकलीचा मृत्यू

घरावर झाड पडून चिमुकलीचा मृत्यू

0

चंद्रपूर,दि.13- मागील काही दिवसांपासून विदर्भातच नव्हे तर राज्याच्या काही भागात  वरूणराजाने वादळीवार्यासह हजेरी लावली आहे. त्यातच आज  चंद्रपुरात विजेच्या कडकडाटीसह जोरदार पावसाने सायकांळच्या सुमारास हजेरी लावली. अचानक आलेल्या जोरदार पावसाने घरावर झाड़ पडून घरात असलेल्या एका ८ वर्षीय चिमुकलीचा मृत्यु झाल्याची घटना घडली. चंद्रपुरातील लालपेठ कॉलनीतील ही घटना असून काजल गुप्ता असे या चिमुकलीचे नाव आहे.काजलच्या मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.

Exit mobile version