Home Top News मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

मुख्यमंत्री फडणवीस पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

0
रायगड, दि. 7 – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी पून्हा एकदा सुदैवाने हेलिकॉप्टर अपघातातून बचावले आहेत. अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद्घाटन सोहळ्याअंती डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावल्याचे प्रत्यक्षदशीचे म्हणने आहे.
त्यानंतर हेलिकॉप्टर पुन्हा लॅन्ड करुन फॅनची रिटेस्ट घेवून त्याच हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस मुंबईस रवाना झाले आहेत.

Exit mobile version